
सोबत.....
मला तुझ्या प्रत्येक दुःखात
तुझ्या सोबत राहायचे आहे
तुझ्या मनातील वेदना
मनाने जाणायच्या आहेत
आणि तुझ्या। प्रत्येक वेळेत तुझ्या
गालावरील सुख व्हायचंय..
तुझ्या त्या पाळीच्या वेदने मध्ये मायेची कूस देऊन तुझं
दुःख वाटून घ्यायचं.
तुझा हातात हात घेऊन त्या
रस्त्यापर्यंत सोबत
चालायचं आहे जिथं शेवट
जगाचा होईल आणी फक्त तू
आणि मी उरलेलो असेल..
मला तुझं सर्वस्व व्हायचय
तुला इतकं प्रेम करायचंय
जिथं सर्व परिसीमा संपून
गेलेल्या असतील!
तुला कायम माझ्या सोबत माझं
एक मन होऊन राहायचं
वाचतेस ना?
डिअर कॉम्रेड