मन रीत करावं..

जर मन रोखत असेल व्यक्त व्हायला तर मनाची अंतर वाढली

अस समजावीत..

पण

जिथ आपलेपणा वाटतो तिथं प्रांजळपणान व्यक्त व्हावं

मोकळं व्हावं

मन रीत करावं..

बोलणाऱ्यांने विपुल शब्द

भावनांनी पेरावे

स्वतःला विखुरल्यासारख

ऐकणाऱ्यानं ते टिपून अलगद घ्यावं हंसासारख

इतकेच काय ते फक्त..

बोलणारा जड असला व्यथा,शब्द, भावनांनी,

तरी ऐकणाऱ्यानीं हलक राहायच असत ..

रीतं राहायचं असत

जमली तर अलगद मारावी फुंकर

नाहीतर न गुंतता,शांत राहायच असत.

        दि बर्फी


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week