
एकच पान प्रेम बंध !!
प्रियकराची वाट पाहत विरहाने आतल्याआत रागवून उठलेली प्रियसी, त्यात संध्याकाळच्या रंगात काळोख अजूनच गर्द होताना..आता तो काही येणारच नाही म्हणून परतीच्या वाटेला पाऊलं तीन वळवावीत..
आणि इतक्यात सॉरी सॉरी म्हणत त्यानं तिच्या समोर उभं राहावं.
आणि या वाट बघून बघून रागावलेल्या क्षणाला, तिला आलेला लटका राग काढता यायला हवा..
तिच्या रागाने लाल बुंद गालावर रेंगाळणारी बट तिच्या कानामागे लावता येणं ही एक कला आहे..आणि प्रियकराला ती कला अवगत असायला हवी.
पूर्ण तापलेल्या आगगाडीच्या इंजिनासारखं धडधडत असणार तिच हृदय त्या क्षणाला अलगद थांबवता यायला हवं,
श्वासांचा कसलाही हुंकारवाज न करता आजूबाजूच्या विश्वाला हरवून त्याला टाळ लागणारे हे मोजके क्षण...
त्या क्षणांनाही आपलं गुपित कळू नये म्हणून..
लाजण्या सावरण्याचा नाजूक खेळ आठवणीने काळजाच्या खोल तळात साठवून ठेवावा !
विरहाची कसलीही बाकी न विसरता ! चुकती करण्याची घटका ती.
प्रेमानं जग समृद्ध करावं.!
ऑरगॅनिक झुक्या!!!!