साद !

  साद... ”

----------

 लगावली  -.  गालगागा गालगागा   गालगागा गालगागा

काळजाला घाव ताजा, तू पुन्हा देवून जा ना

डाव अर्धा कालचा जो, पूर्ण तू खेळून जा ना

तो उन्हाळी दिवस आणिक, भेट अधुरी पावसाची 

हस्त नक्षत्रासमानी, आज तू बरसून जा ना

लागले वाटेवरी हे, चातकासम आज डोळे

या मनाची काळतृष्णा, साजणी.. मिटवून जा ना

बघ कसे राती पुनवचे, चांदणे हे आज पडले

ये अशी सौदामिनीसम, जीवना उजळून जा ना

काल झाली पानगळ ती, आज झालो मी रिकामा

आण तू माझ्या वसंता, अन मला फुलवून जा ना 

कैक स्वप्नांचे मनोरे, बांधले मी प्रेमदेशी

काळजाच्या साकवाला, दोर तू बांधून जा ना

          ©® - गुज अंतरीचे (अर्जुन...)


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week