
कुणीच केलं नाही प्रेम !!
चारोळ्या
ऑरगॅनिक झुक्या????️
कुणीच केलं नाही प्रेम
तरी मने जुळून गेली
कळलं नाही कुणासही
प्रीत कधी उमलून गेली
तू होतच आहेस पाऊस
तर मी ही मग ऊन व्हावे
असे व्हावे आपले मिलन
बघून इंद्रधनुष ही लाजावे
रात्र होण्याची वाट
मी पण बघत असतो
सत्यातले क्षण
स्वप्नात जगत असतो
काय बोलू आता
फोटो पाहून झालो दंग
सुचत नाही मला
वेड लावून जाईल
तुझे सोनेरी अंग
का उगाच झाकिसीं
नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड
स्पर्श तुझा चंदनी
ऑरगॅनिक झुक्या????️