
वचन !
कितीतरी वेळा तू स्वप्नात येतोस
किती गोड हासतो
मी बोलत नाहीं म्हणून
माझ्यावर रुसतोस
स्वप्नात येतोस
त्या तीथे भेटायचं
म्हणून वचन देतोस
मी ठरल्या ठिकाणी येते
वाट पाहते चरफडते
कंटाळते पेंगुळते
स्वतःला हरवून जाते
तरीही तू माझ्या मनात
हळू स्वप्नात येतोस
चोरपावलांनी
आणि पुन्हा स्वप्नात येतोस
तसाच गोड हासतोस
स्वप्नाला शेवट असतोका?
काळ थोडातरी चावट असतो का?
प्रीती तिवारी