दोन जीव एक प्राण.....
तुझ्या प्रितीच चांदणं
मी ही घेते पांघरून
गोड तुझ्या मिठीमध्ये
जाते मी विरघळून ...
आधरावरचा मध
तू ही चाखून घेतला
घट्ट मिटल्या डोळ्यात
भाव सलज्ज दाटला....
रातराणी गवाक्षाशी
अशी आली बहरून
तुझ्या स्पर्शाने सखया
शहरले तन-मन....
तुही सोडता अंबाडा
मुक्त झाली कुंतले
धुंद रातीचा प्रणय
हात हातात गुंफले...
गंधाळली धुंद रात
मोहरले गात्र गात्र
दोन जीव एक प्राण
श्वास मिसळले एकत्र....
(ध्रुव पुणे)