मोबाईल चोर पोलिसांच्या अटकेत !!

मोबाईल चोर पोलिसांच्या अटकेत !!

मुंबई शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे, रस्त्याने चालताना ट्रेनमधून सराईतपणे चोरटे मोबाईल चोरी करीत असतात, इवन हातातूनही हिसकावून घेऊन पळत असतात. आणि हे वाढते प्रमाण लक्षात घेता सतर्क असलेले मुंबई पोलीस हे अशाच मोबाईल चोरट्यांवर लक्ष ठेवून असतात. अशाच एका सराईत मोबाईल चोरास पोलिसांनी अटक केली.


        सराईत मोबाईल चोर नामे मोहम्मद साबीर अहमद शेख उर्फ साबीर बाकडा वय ४२ वर्ष राहणार ठिकाण जोगेश्वरी (पु) मुंबई ह्याच्या हालचालीवर दा.नौ. पोलीस ठाणे हे 

 लक्ष ठेवून होते. पोलिसांनी सापळा रचुन मोहम्मद साबीर अहमद शेख उर्फ बाकडा ह्यास ताब्यात घेतले.


दा.नौ. पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २४७,२४ कलम ३८० भारतीय दंड विधान या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला असल्याने त्याला अटक करण्यात आली.

 

        नमूद आरोपीकडे कौशल्य पूर्ण तपास करून एकूण १६ मोबाईल अंदाजे एकूण किंमत १,६०,००० रुपये हस्तगत करण्यात आलेले आहेत. नमूद आरोपीताकडून हस्तगत केलेले मोबाईल हे जोगेश्वरी, मालाड, अंधेरी, या ठिकाणावरून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

       तसेच मोबाईल मालकांचा शोध घेऊन पुढील तपास करत आहेत सदर आरोपीत याचे विरुद्ध मेघवाडी, जोगेश्वरी तसेच दा,नौ.नगर पोलीस ठाणे येथे मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.


सदरची कामगिरी दा.नौ.नगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील घाडगे, पोलीस हवालदार श्री पाटील, पोलीस हवालदार श्री गायकवाड, पोलीस हवालदार श्री हळदे, पोलीस शिपाई श्री पांढरे, पोलीस शिपाई श्री रांगणे यांनी पार पाडली आहे.


Batmikar
कार्यकारी संपादक - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week