चल लूट मचायेंगे....
औद्योगिक वसाहती मधील कॉपर वायरच्या कंपनीवर दरोडा टाकून सुमारे २८ लाख रुपये किमतीच्या
मुद्देमालाची लूट करणाऱ्या आरोपींना शिताफिने मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश !!!!
दिनांक ३/७/२४ रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्वे नंबर ५६ गाळा नंबर एक, दोन, तीन, चार, नेबिकाब केबल इंडस्ट्रीज, रिचार्ज कंपाउंड, मनीचापाडा नालासोपारा पूर्व. येथील दोन वॉचमेन, साक्षीदार यांना सात ते आठ जण तोंडावर रुमाल बांधलेले अशा अनोळखी इसमांनी शिवीगाळी करून मारहाण केली व त्यांचे हातपाय बांधून रूममध्ये कोंडले त्यानंतर कंपनीचे शटर उचकटून कंपनीतून अंदाजे रुपये २९ लाख किमतीचे तयार केबल व रॉक कॉपर मटेरियलचे बंडल जबरदस्तीने चोरी करून आयशर सारख्या गाडीतून घेऊन पळून गेले.
सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६७६, भारतीय न्याय संहिता कलम ३१०,२२७ (२) २५२,११५ (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहती मधील कंपनीमध्ये रात्रीच्या दरम्यान दरोड्याचा गंभीर गुन्हा घडला असल्याने माननीय पोलीस उपायुक्त (गुन्हे), माननीय सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या सूचना व आदेशान्वये गुन्ह्याच्या समांतर तपासा दरम्यान, घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज मध्ये संशयित आरोपी निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनिय बातमीवरून आरोपी (१) रियाजुल रहमान शेख वय वर्ष ३७, राहणार मालाड पश्चिम (२) ईशान अब्दुल रहमान शेख वय ४१ वर्ष, राहणार गोरेगाव पश्चिम मुंबई (३) राजू प्रसाद राम खिलावन विश्वकर्मा वय ३६ वर्ष, राहणार भिवंडी तालुका कल्याण जिल्हा ठाणे (४) विजय किशन वाक वय ३९ वर्ष, राहणार, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे (५) कुणाल उर्फ शिवराम सोमा खडके वय ३४ वर्ष, राहणार शहापूर (६) कुणाल सुनील जाधव वय ३० वर्ष, राहणार बदलापूर, तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे (७) सद्दाम रही मणिहार वय ३० वर्ष, राहणार बदलापूर (८) सलीम फत्तेमोहम्मद अन्सारी वय ४० वर्ष, राहणार गोवंडी चेंबूर मुंबई यांना दिनांक ६/७/०२४ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.
नमूद आरोपी यांच्याकडून हस्तगत मुद्देमाल २८ लाख रुपये किमतीचा रॉक कॉपर बंडल व तयार कॉपर केबलचे बंडल, २५ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीचा ट्रक.
पाच लाख रुपये किमतीची मारुती व्हॅगनार, ५० हजार रुपये किमतीची युनिकॉर्न मोटरसायकल,
१ लाख ५९ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, एकूण रुपये ६० लाख ९००० इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपिंचा गुन्हेगारी पूर्वाभिलेख पडताळून पाहता त्यांच्यावर नारपोली पोलीस स्टेशन ठाणे, नारपोली पोलीस स्टेशन ठाणे शहर, कळवा पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जळगाव, याठिकाणी खून, दरोडे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी नामे ईशान अब्दुल रहमान शेख व इतर गुन्हेगारांचा पूर्व अभिलेख खालील प्रमाणे आहे. नारपोली पोलीस ठाणे, राजू प्रसाद राम खिलवन, विश्वकर्मा याच्या विरुद्ध भिवंडी तालुका पोलीस ठाणे, तसेच विजय किसन वाघ याचा गुन्हेगारीचा पूर्वाभिलेख गणेशपुरी पोलीस ठाणे, आरोपी कुणाल उर्फ शिवराम सोमा खडके याचा कसारा पोलीस ठाणे ग्रामीण येथे गुन्हे दाखल आहेत
पुढील कारवाई करिता सदर आरोपी यांना पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर ५७६ भारतीय न्याय संहिता कलम ३१०,२२७(२) ३५२,११५ (२) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी श्री मधुकर पांडेय पोलीस आयुक्त, श्री श्रीकांत पाठक, अप्पर पोलीस आयुक्त, श्री अविनाश अंबुरे पोलीस उपायुक्त, (गुन्हे) श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवरकर, अश्विन पाटील, पोलीस अमलदार राकेश पवार, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तरडे, तुषार दळवी, अतिष पवार, प्रवीण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे, व सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेम सायबर सेल यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडली.