रेल्वे महिला प्रवासीच्या हातातला मोबाईल जबरीने पळून घेऊन गेलेल्या चोरट्यास सहा तासात अटक!!

रेल्वे महिला प्रवासीच्या हातातला मोबाईल जबरीने पळून घेऊन गेलेल्या चोरट्यास सहा तासात अटक!!

       दिनांक १४ जून २०२४ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तस्मिन आलम शेख वय वर्ष २४, राहणार ठिकाण रूम नंबर २३१, बगीच्या कंपाउंड, सोना मार्केट, माहीम (पश्चिम) या चर्चगेट बोरीवली मुंबई स्लो लोकल ने माहीम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उतरल्या असताना, एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातामध्ये असलेला २० हजार रुपये किमतीचा सॅमसंग M३३ मोबाईल फोन जबरीने खेचून चोरी केला आणि पळून गेला. सदर फिर्यादीनुसार मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०९/२४ भारतीय दंड विधान कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

         गुन्ह्याचा समांतर तपास बांद्रा युनिट सहा मुंबई लोहमार्ग यांच्या मार्फत करण्यात आला. तपासा दरम्यान माहीम रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन केले असता. आरोपी जबरी चोरी करून पळून जात असताना दिसला. त्यानंतर गुप्त बातमीदार कडून आरोपीची माहिती घेऊन त्याला दिनांक १४ जून २०२४ रोजी ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झालेला असून त्याने जबरीने चोरी केलेला सॅमसंग ३३ हा मोबाईल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.


         रेल्वे महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिलांच्या हातातील मोबाईल जबरीने खेचून पळून जाण्याचा गुन्हा करण्यात तो एक्सपर्ट होता. वरील गुन्ह्याची शहानिशा झाल्यावर आरोपी

 मोहम्मद इलियाज मोहम्मद जमेल शाह वय २२ वर्ष, राहणार ठिकाण गुलजार बेकरी, माहीम दर्गाजवळ, माहीम मेडिकलच्या बाजूला, माहीम केडर रोड, माहीम पश्चिम. मुंबई मुळगाव बालपुर, तालुका कर्नलगंज, जिल्हा गोंडा, उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आलेली आहे.


सदरची कामगिरी श्री रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई. श्री मनोज पाटील पोलीस उप आयुक्त लोहमार्ग मध्य परिमंडळ मुंबई, श्री राजेंद्र रानमाळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, श्री अरशुद्दीन शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री रोहित सावंत पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजीत भूपेंद्र टेलर, सहाय्यक पोलीस फौजदार गणेश शिरसागर, रवींद्र दरेकर, पोलीस हवालदार महेश सुर्वे, सोमनाथ गायकवाड, सुरेश एल्ला, प्रशांत साळुंखे, पोलीस नायक सिकंदर तडवी, सत्यजित कांबळे, अमरसिंह वळवी, पोलीस अंमलदार सागर हिंगे, अक्षय देसाई, सुरेश मागाडे यांनी पार केली.


Batmikar
कार्यकारी संपादक - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week