अक्षय तृतीया !!

अक्षय्य मैत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

   शीर्षक वाचून चक्रावले असाल 

परंतु आज अक्षय्य तृतीया निमित्ताने आपण "मैत्र दिन" म्हणून साजरा करूयात. याचे कारण म्हणजे

आम्हा कीर्तनकार, भागवतकार यांना आठवण होते ती दोन मित्रांची 

 आपल्या मनावर सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामाजिक ठसा उमटवणारी व्यक्तिमत्व म्हणजे 

भगवान गोपाल कृष्ण आणि त्यांचा अतिशय लाडका मित्र सुदामा..

संदीपनी ऋषींच्या आश्रमात या दोन मित्रांची भेट होते एकत्र अध्ययन सुरू होऊन काही वर्षांनी अध्ययन पूर्ण करून दोघांची ताटातूट होते. एक द्वारकेचा राणा होतो तर दुसरा आयाचीत व्रत धारण करून उदरनिर्वाह चालवतो.

गरिबीत दिवस काढणारे सुदामजी भगवंताला भेटायला द्वारकेला येतात ....भगवंताची भेट होते..

भगवंताचे आदरातिथ्य सुदामजी स्वीकारतात..

भगवंत आपल्या भक्ताची आपल्या मित्राची कशी सेवा करतात याचे अतिशय हृदयस्पर्शी वर्णन वाचताना ऐकताना देहभान हरपून जाते आणि 

न कळत डोळे पाणावतात. या अलौकिक क्रियेतील एक अत्युच्च क्षण म्हणजे भगवंत सुदामजींच्या कपाळावर चंदनाचा लेप लावतात तो लावताना विधीने लिहिलेला. श्रीक्षयः हा योग पुसून यक्षश्रीः असा योग निर्माण करतात विधात्याने लिहिलेला लेखाला 

 " श्रीक्षयः ते यक्षश्रीः " असा उलटवून टाकतात (कुबेराच्या घरी जेवढी संपत्ती नसेल तेवढी संपत्ती माझ्या मित्राला मिळावी) असा आदेशच भगवंत देतात पुढील कथा आपल्याला ज्ञात आहेच हा प्रसंग ज्यावेळेस घडला त्या दिवसाला अक्षय तृतीया असे आमच्या आख्यान परंपरेत मानले जाते.

       मला नाही वाटत की आजपर्यंत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी एवढ्या पराकोटीचे सहाय्य केले असेल म्हणून आजच्या या अक्षय तृतीयेला आपण आपल्या हिंदू धर्मातील मैत्री दिन म्हणायला हरकत नाही.

   आपल्याही बाबतीत असे अनेक कृष्ण-सुदामा आपल्या आजूबाजूला मित्र रूपाने वावरत असतात की ज्यांचं अस्तित्वच आपल्याला खूप मोठी उभारी देत असते. आजच्या या मैत्री दिवशी अशाच मित्रांना हा संदेश पाठवून अक्षय्य मैत्री दिनाच्या शुभेच्छा देवूयात. 

©️ह.भ.प.श्रेयस मिलींद बडवे 

9881210465


Batmikar
कार्यकारी संपादक - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week