नायगावात सापडला मानवी हाडांचा सापळा !!

नायगावात सापडला मानवी हाडांचा सापळा !!

      नायगाव (वसई) पूर्वेच्या रेती बंदरात हाडांचा सापळा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. कवटी आणि हाडे वेगवेगळ्या ठिकाणी होती. पोलिसांनी हाडांची जुळवाजुळव करून न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविलेले आहे. हाडाचा फक्त सापळा असल्याने तो पुरुषाचा आहे की महिलेचाचा आहे ते स्पष्ट झाले नाही, नायगाव पूर्वेला रेतीबंदर असून तिथे तीवरांची झाडे आहेत.

             रविवारी सकाळी लघुशंकेसाठी गेलेल्या इसमाला झुडपात एक मानवी कवटी आढळून आली. त्याच्याच काही अंतरावर हाडांचा सापळा आढळून आला. त्याने तत्काळ याबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हाडांचे अवशेष गोळा केले असून न्याय वैद्यक तपासणीसाठी पाठविलेले आहेत. अहवाला नंतर ती हत्या आहे की अपघाती मृत्यू आहे हे स्पष्ट होईल. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week