नकली आधार कार्ड बनवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !!
शासकीय कामासाठी आवश्यक असलेली बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दोन आधार कार्ड सेंटरवर मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष सहा कडून कारवाई !
मुंबई गुन्हे शाखा कक्ष ६ यांना नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी व जुन्या आधार कार्ड वरील नाव व पत्ता इत्यादी मध्ये बदल करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे, प्रमाणपत्रे, विशिष्ट रक्कम स्वीकारून कॉम्प्युटर च्या साह्याने बनावट कागदपत्र तयार करतात अशी गोपनीय माहिती मिळाली.
अशी गोपनीय माहिती मिळताच सातत्याने त्याचा पाठपुरावा शहनिशा करून पोलिसांनी सापळा रचला व दिनांक १६.१.०२४ रोजी रजा इंटरप्राईजेस रोड नंबर १० गोवंडी मुंबई व काश्मी हायस्कूल हे बनावट कागदपत्रे जन्म दाखले, बँकिंग करिता आवश्यक केवायसी, रेशनिंग कार्ड, पाणीपुरवठा देयक, इत्यादी सरकारी दस्ताऐवज त्यांच्याकडे लॅपटॉप व संगणकातील ठराविक डिजिटल एप्लीकेशनच्या सहाय्याने ग्राहकाकडून कोणतेही कागदपत्रे न घेता बनावट कागदपत्रे तयार करून ती कागदपत्रे आधार कार्ड बनविण्यासाठी वापरून ती खरी असल्याचे वाचवून आरोपी इसमानी संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायदया करिता शासनाची फसवणूक केली, असे असे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी इसम (१) मेहफूज अहमद खान वय वर्ष ३८ (२) रेहान शहा आलम खान वय वर्ष २२ (३) अमन कृष्णा पांडे वय वर्षे २४ यांचे विरुद्ध दिनांक १७.१.२४ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५० कलम ४२०,४६५, ४६७,४६८ भारतीय दंड विधानसह कलम ३४ च्या आधार नियमावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे. ह्या सर्व आरोपीना माननीय न्यायालय समक्ष रीमांड करिता हजर केले असता, माननीय न्यायालयाने दिनांक २२.१.२४ पर्यंत पोलीस रिमांड कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मुंबई शाखा कक्ष ६ करीत आहे.
सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर, माननीय विशेष पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती, माननीय पोलीस सह आयुक्त गुन्हे श्री लाखमी गौतम, माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शशी कुमार मीना, माननीय पोलीस उपायुक्त प्रकटीकरण श्री राज तिलक रौशन व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त (डी पूर्व) श्री चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष ६ प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे पोलीस निरीक्षक पवार पोलीस निरीक्षक ननावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, पोलीस उपनिरीक्षक मोठे, पोलीस उपनिरीक्षक राहणे, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, पोलीस उपनिरीक्षक बेलणेकर, पोलीस उप नि सावंत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सकपाळ, फौजदार आव्हाड, कोरडे, पोलीस हवालदार पारकर, तुपे पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार वानखेडे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार गायकवाड, मोरे, घेरडे, पोलीस शिपाई भालेराव, माळवेकर, पोलीस शिपाई कोळेकर, इंगळे, महिला पोलीस शिपाई अभंग, पोलीस शिपाई पवार, महिला पोलीस शिपाई सरोदे, महिला पोलीस शिपाई सुतार, पोलीस हवालदार डाळे, कदम पोलीस हवालदार जायभाये, पोलीस शिपाई पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.