
गझल !!
तू स्वतःला
तू स्वतःला ओळखावे तू स्वतःला
तू स्वतःला पारखावे तू स्वतःला
या जगाचा काय द्यायचा भरवसा
तू स्वतःला वाचवावे तू स्वतःला
लावताना बोल तू दुसऱ्या कुणाला
तू स्वतःलाही पहावे तू स्वतःला
लावता आदर्श नीती गुण मूल्ये
तू स्वतःला दाखवावे स्वतःला
ठेवून विश्वास प्रीती ईश्वरावर
तू स्वतःला चालवावे तू स्वतःला
लगावली नारनाना३/ वृत- मंजुघोषा/ मात्रा २१
प्रीती तिवारी
मुंबई