
दिवाळी !!
दिवाळी
मांगल्याचा सण
समृद्धीचा सण
तेजाची ज्योत
दिवाळी
घराचं घरपण
नात्याचा जिव्हाळा
आनंदाचा सोहळा
दिवाळी
अंगणातील रांगोळी
रंगाची उधळण
पणत्यांची
आरास
स्वप्नांचा मुहूर्त
दिवाळी
फुलांचा गंध
देव्हारी साज
घराचे मंदिर
दिवाळी
गोडधोडाचा फराळ
फटाक्यांची माळ
तूषारांचा अनार
शोभवितो दार
दिवाळी
देऊ घेऊ शुभेच्छा
घट्ट करू नाती
आयुष्याची सोबत
दिवाळी
प्रीती तिवारी (लोअर परेल)