प्रेम विवाहतून झालेल्या दोन मृतदेहांच्या खुनाचा केला उलगडा !!

प्रेम विवाहतून झालेल्या दोन मृतदेहांच्या खुनाचा केला उलगडा !!

       गोवंडी पोलीस ठाणे हद्दीत अंदाजे वीस ते बावीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेबाबत गोवंडी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोवंडी पोलीस ठाणे यांनी दहा पोलीस पथके तयार केली.

       नमूद पथकांनी कौशल्य पूर्ण तपास करून करून मयताची ओळख पटविली. मयत इसम करण रमेशचंद्र वय २२ वर्ष हा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी गोवंडी पोलीस ठाणेस कलम ३०२,२०१ भारतीय दंड विधान अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे, अधिक तपास करीत मयत इसमाच्या पत्नीचे वडील गोरा रईसउद्दीन खान, वय ५० वर्ष याला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले.

      संशयित इसमाकडे विचारपूस केली असता त्याचा मुलगा सलमान गोरा खान वय वर्ष २२ व त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे सांगितले. आरोपिताची मुलगी गुलनाज व तिचा पती करण यांचा मागील वर्षी प्रेमविवाह झाला होता. त्या रागातून खून केल्याची माहिती आरोपीने दिली. आरोपीने दाखविलेले ठिकाण नवी मुंबई येथून गुलनाज हिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.

       गोवंडी पोलीस ठाणे यांनी गोरा रईस उद्दीन खान वय वर्ष ५०, त्याचा मुलगा सलमान गोरा खान वय २२ वर्ष, सलमानच्या मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान यांना अटक केली असून तीन विधी संघर्षित बालकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

      पुढील गुन्ह्याचा तपास तपास पोलीस निरीक्षक अनिल हिरे करीत आहेत. सदरची कामगिरी अप्पर आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री विनायक देशमुख, माननीय पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त चेंबूर विभाग श्री जगदेव कालापाड यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री सुदर्शन होनवजडजर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोवंडी पोलीस ठाणे, यांच्या नेतृत्वाखाली गोवंडी ट्रॉम्बे टिळक नगर, चेंबूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व पथकाने केलेली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी