तीस साल पाहिले किये हुये मर्डर के उखाडे गडे मुडदे !!
३० वर्षा पुर्वी एक २७ वर्ष वयाची एक महिला व तिच्या ५ वर्ष खालील मुलांचा दोन सख्या भावांनी केलेला खून व त्या खुनी आरोपीना उत्तर प्रदेश वाराणशी येथे पोलिसांनी केली अटक, परिमंडळ १ ची यशस्वी कामगिरी !!
खून करणे म्हणजे हल्ली इझी गुन्हा झालाय !
खून करून प्रेताची व्हिलेवाट लावून खून पचवण्याचा कितीतरी गुन्हेगार प्रयत्न करतात. काही पचवतात, तर काही केलेला गुन्हा पचवण्यासाठी पळवाटा शोधतात. परंतु गुन्ह्याला माफी नाही, त्याची शिक्षा ही आरोपीला भोगावी लागते. मग किती वर्षे का सरेना आरोपी पकडला जातोच जातो,
म्हणतात ना "पाण्यावर थुंकले तर ते कधीच लपत नाही, ते वरतीच येतं अशाच या म्हणी सारखा ३० वर्षा पूर्वी केलेला गुन्हा उघडकीस आला.
३० वर्षा पूर्वीची अंगाला काटे आणणारी घडलेली गोष्ट, कोण किती निर्दयी असू शकत ? की हत्या करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. ह्याचे उदाहरण मिरारोड काशी मीरा येथे घडली. फिर्यादी राजनारायण प्रजापती राहणार पेणकरपाडा, काशीमीरा, ता. जि. ठाणे, मूळ राहणार जिल्हा इलाहाबाद उत्तर प्रदेश, यांची पत्नी मयत सौ. जगरानीदेवी प्रजापती.
तिच्यासोबत आरोपी अनिल सरोज वय वर्ष २७ आताचे वय वर्ष ५०, सुनील सरोज वय वर्ष २० सर्व राहणार पेणकरपाडा, काशीमिरा. मूळ राहणार जिल्हा जोनपुर उत्तर प्रदेश. यांचा मोठा भाऊ गुलाबचंद सरोज याचे सोबत नेहमी किरकोळ भांडणे होत असत. झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून वर नमूद आरोपीसह राहणारा काल्या उर्फ साहेब ऊर्फ राजकुमार अमरनाथ चौहान वय १९ वर्ष असे तिघांनी मिळून फिर्यादीची पत्नी आणि तिची मुले नाव
१) सौ. जगरानी देवी वय वर्ष २७
२) मुलगा कु. प्रमोद वय ५ वर्ष
३) मुलगी कु. पिंकी वय वर्ष ३.५
४) मुलगा कु. चिंटू वय २ वर्ष
५) ३ महिन्याचा लहान मुलगा
यांचा चाकू भोसकून निर्दयपणे निर्घृण खून केला आणि बाहेरून कुलूप लावून बंद करून वापरलेली हत्यारे आणि अंगावरचे रक्ताने माखलेले कपडे आरोपी राहत असलेल्या घरात लपवून ठेवले. याबाबत काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक १०७/१९९४ भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१, ४५२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गंभीर व क्लिष्ट स्वरूपाचे खुनाचे गुन्हे ओळखीस आणण्याचे वरिष्ठ पोलीस यांनी आदेश दिले होते. गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या तपास पथकाने पथकाने जून २०२१ मध्ये वाराणसी उत्तर प्रदेश येथे वीस दिवस वास्तव्य करून करून स्पेशल टास्क फोर्स (STF), वाराणसी राज्य उत्तर प्रदेश यांच्या मदतीने तपास केला होता त्यावेळेस आरोपीबाबत कोणतेही ठोस माहिती प्राप्त झाली नव्हती. सदर गुन्ह्याचा आज पावतो सलग पाठपुरावा करून आरोपींची माहिती मिळवण्याचे प्रयत्न करीत असताना आरोपी हे सोहनी किराकत जोनपुर राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणी स्वतःचे नाव बदलून कोणताही संशय येणार नाही अशा रीतीने राहत असल्याची तसेच त्यापैकी एक विजय नाव धारण केलेला भूतबाधा उतरवून देणे दारू सोडविणे इत्यादीसाठी अंगारा भस्म मंत्र लिहिलेला कागद इत्यादी देतो व त्याला लोक विजय महाराज उर्फ विजय बाबा असे संबोधतात अशी माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीची एस टी एफ व गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा पथकाच्या मार्फतीने सहनिशा करून आरोपी हे तेच आरोपी आहेत याची खात्री पटल्यानंतर आरोपी अनिल उर्फ विजय राम अवध उर्फ अवधू वय ४८ वर्ष, सुनील उर्फ संजय राम अवध सरोज, वय ४७ वर्ष दोन्ही राहणार सध्या ग्राम पोस्ट सोहनी तहसील केराकत जिल्हा जोनपुर राज्य उत्तर प्रदेश यांना दिनांक ७/१०/२०२३ रोजी साडेअकरा वाजता ताब्यात घेतले.
आरोपीतांकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली असून हत्याकांड केल्यानंतर आरोपी हे बरीच वर्ष दिल्ली हरियाणा पंजाब इत्यादी राज्यात स्वतःचे अस्तित्व लपवून वास्तव करीत होते तद नंतर ते त्यांच्या मूळ गावापासून थोड्या दूर अंतरावर असणाऱ्या त्यांच्या आजोळी ग्राम सोहानी तहसील केराकत, जोनपुर राज्य उत्तर प्रदेश येथील मावशीकडे नावे बदलून वास्तव्य करीत होते. आरोपी त्यांनी बदललेल्या नावाने आधार कार्ड, रेशनिंग कार्ड बनविले असून मतदान यादीत समाविष्ट करून घेतले आहे. खून केल्यानंतर आरोपी हे आज पावतो त्यांचे मूळ गावी गेलेले नसून काही ठराविक नातलग सोडून कोणाच्याही संपर्कात राहत नव्हते.
सदरची कामगिरी कामगिरी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे माननीय श्री अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त गुन्हे, मा. अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमिरा येथील पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले. प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे सहाय्यक फौजदार, राजू तांबे, संदीप शिंदे पोलीस हवालदार अविनाश गरजे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेन्द्र थापा, विजय गायकवाड, सचिन हुले, सचिन सावंत, समीर यादव, सुधीर खोत, विकास राजपूत, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, सनी सूर्यवंशी, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर विभाग तसेच उत्तर प्रदेश एसटी वाराणसी ब्रांचचे पोलीस उपअधीक्षक श्री शैलेंद्र प्रताप सिंह, पोलीस निरीक्षक श्री अमित श्रीवास्तव, पोलीस उपनिरीक्षक श्री अंगद सिंह, यादव, श्री शहजादा खा, श्री ज्ञानेन्द्र सिंह, पोलीस हवालदार अरविंद सिंह, धनंजय श्रीवास्तव, ब्रजेश सिंह, राहुल सिंह, सत्यपाल सिंह, पोलीस हवालदार चालक यशवंत सिंह, राजकुमार राय यांनी यशस्वीरित्या पार केली.