नायगाव येथील बेपत्ता मेकअप आर्टिस्ट ची हत्या !!

नायगाव येथील बेपत्ता मेकअप आर्टिस्ट ची हत्या !!

          प्रियकरांनीच केली हत्या

       एक महिन्यापासून बेपत्ता असलेली नायगाव येथील मेकअप आर्टिस्ट नयना महंत वय वर्ष 29 हीची प्रियकरांनी हत्या केल्याची उघड झाले आहे. तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून वलसाडच्या खाडीत फेकून देण्यात आला. नयना हिचा विवाहित प्रियकर मनोज शुक्ला, वय वर्ष 43 याला अटक केली आहे.

          नयना महंतही तरुणी सिनेमा केशभूषाकार म्हणून काम करायची. ती नायगाव पूर्व च्या एक इमारतीमध्ये राहत होती. 12 ऑगस्ट पासून ती बेपत्ता होती. पोलीस ठाण्यात तिच्या बहिणीने तक्रार दाखल केली होती. तपासात नयना हिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर मनोज शुक्ला वय वर्ष (४३), याने नयनाची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

          नयनाला पाण्यात बुडवून तिची हत्या केली हे निष्पन्न झालेआहे. नयना हिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून गुजरात येथील वलसाडच्या खाडीत मनोज याने पेटीसह फेकून दिला होता. वलसाड येथील पोलिसांना तिचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी मनोज शुक्ला याला नायगाव पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली आहे. अशी माहिती नायगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे यांनी दिली आहे. नयना नायगाव मध्ये एकटी राहत होती. 12 ऑगस्ट पासून तिचा फोन बंद येत होता अशी तक्रार तिची बहीण जया  हिने केली होती.

          त्या बिल्डिंगच्या सीसीटीव्ही मध्ये मनोज शुक्ला हा सुटकेस घेऊन जाताना दिसला होता. सोबत त्याची पत्नी देखील होती. तिला देखील आरोपी केले जाणार आहे. नयना पूर्वी वसईला राहत होती सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या मनोज शुक्ला बरोबर तिचे प्रेम संबंध होते. मात्र तो विवाहित असल्याचे समजल्यानंतर तिने हे संबंध तोडले. त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी मनोज शुक्ला तिच्यावर दबाव टाकीत होता. त्यामुळे ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी