मै सी.बी.आय कमिशनर हू ! सी.बी.आय कमिशनर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इसमास काशिमिरा पोलीस ठाणे यांनी ठोकल्या बेड्या !

मै सी.बी.आय कमिशनर हू ! सी.बी.आय कमिशनर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इसमास काशिमिरा पोलीस ठाणे यांनी ठोकल्या बेड्या !

          फिर्यादी श्री दिनेश प्रताप रामनारायण सिंग, वय वर्ष ५६ राहणार नायगाव पूर्व यांना दिनांक ५.८.२२ ते १३.४.२०२३ दरम्यान आरोपी नामे सोहेल अब्दुल आर खान राहणार बेवरली पार्क, मिरा रोड पूर्व याने ते स्वतः सीबीआय कमिशनर असल्याचे खोटे सांगून फिर्यादीस जीएसटी कमिशनर यांचे कडून प्राप्त झालेल्या नोटीस मध्ये क्लीन चीट मिळवून देतो व त्यानंतर चांगला ठिकाणी गुंतवणूक करून नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून फिर्यादी कडून रोख व बँक ट्रान्सफर द्वारे रक्कम २६.००.००० स्वीकारून फसवणूक केली. ह्या बाबत काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर T ६४०// भारतीय दंड विधान कलम ४०६,४२०,१७० दिनांक १०.९.०२३ द्वारे दाखल केला आहे.

              सदर मनातील आरोपी सोहेल अब्दुल आर.खान राहणार बेवरली पार्क, मिरा रोड, पूर्व यास दिनांक १०.९.०२३ रोजी अटक करण्यात आली. केलेल्या तपासात त्यांनी फिर्यादीस ते सीबीआय कमिशनर असल्याचे भासवून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

          सदर कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ-०१ श्री जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री महेश तरडे मिरा रोड पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री संदीप कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेश मनोरे यांनी केली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी