
गझल तुला पाहिले की !
तुला पाहिले की बरे वाटते
सखे दुःखही हासरे वाटते
तुझे हासणे अन् जरा लाजणे
मुखावर गडे साजरे वाटते
सखीचे कधी टाकुनी बोलणे
जसे काळजावर चरे वाटते
नभी इंद्रधनू पाहिल्यावर सखे
जगाची कुरुपता सरे वाटते
निळ्याशा नभी घन भुरे पांढरे
जशी लावली अस्तरे वाटते
निरागस मनी भाबडे वागणे
जगी- मात्र वेडे ठरे वाटते
लगावली,- रनाना३ रना। वृत्त सौदामिनी। मात्रा १८