
स्वप्नवेल
स्वप्नवेल. . . .!
असेल सुर्य तेजोमय...
आणि असेल ही चंद्राचं लोभस चांदणं !
आपण ही लावु एक छोटिशी पणती
तेजस्वी प्रकाशाची ... !
आपल्या प्रेमाची
उद्याच्या स्वप्नाची !
तुझ्या डोळ्यांना देईन
मी स्वप्न हजारभर..
आणि तुला पहात राहिन ,
स्वप्न पहाताना... रंगविताना
तसं माझं तर एकच स्वप्न .
माझी ओंजळ भरावी ,
तुझ्या आनंदाश्रुच्या मोत्यांनी
एक प्रयास माझा ,
तुला सदैव आनंदी पहाण्याचा .
त्या साठी हवेत
दोन शब्द
फक्त दोनच शब्द प्रेमाचे !
आणि - - ,
ते पण तुझेच !!
(प्रद्युम्न देशपांडे)