
आठवणींचा उहापोह !!
सरत्या वर्षातील आठवणी
मनाला का बोचून जातात
वर्ष कस जाईल आनंदी
या विचारात दिवस सरतात....
मंतरलेल्या सरत्या
आठवणी
वर्षभर अश्या जपून ठेवतांना
वाट्याला विदारक प्रसंगाच्या
डोळयांत अश्रू रोज पाहताना
वर्ष कसं धावत गेलं जीवनात
आज भूतकाळात वळून पाहिलं
प्रत्येक दिवस संघर्षमय गेला
हेच जीवन का जगायचं
राहिल!
दोष कशाला ध्यावा दिवसाला
हे कालचक्र जगी सुरूच राहणार
सुखाच्या लालसेने मानवाचे
सुखदुःखाचे गणित मांडणार
मावळतीच्या वर्षतील सूर्याला
पाहताना
गोड, कडू आठवणी
लेखणीतून मांडता येणार नाही
अनुभवातून शिकायला भेटले
हेच सरत्या वर्षाचे गुपित पाही
कवियत्री प्रीती तिवारी !!