
पर्दे के पिछे क्या है ??
दहिसर येथील चिरंजीवी बार व रेस्टॉरंट वर केली धडक छापेमारी !!
दहिसर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 1762/ 22 कलम 308, 342, 294, 114, 34 भा द वि सह कलम 3, 8(1),(2),(4) महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत केली छापेमारी.
दिनांक 16/12/2022 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना विश्वसनीय माहितीदाराकडून अशी माहिती प्राप्त झाली की, दहिसर पोलीस ठाणे हद्दीतील चिरंजीवी बार अँड रेस्टॉरंट या हॉटेल आस्थापनेत 15 ते 20 बारबाला असून तेथे अश्लील डान्स सुरू आहे. सदर माहिती प्राप्त होताच रात्रपाळी पर्यवेक्षीय पोलीस निरीक्षक संजय मराठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निमगिरे, एदाळे, पोलीस उपनिरीक्षक कोते व स्टाफ यांनी सदर ठिकाणी 23.20 वाजता पंचांसह छापा टाकून तपासणी केली असता सदर आस्थापनेत 04 बारबाला हॉलमध्ये नृत्य करताना मिळून आल्या. दरम्यान आस्थापनेत जास्त बारबाला असल्याची माहिती प्राप्त असल्याने संपूर्ण बार आस्थापनेची सूक्ष्म पाहणी केली असता आस्थापनेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या मेकअप रूममध्ये आरशाच्या मागे एक साधारण 16 फूट बाय आठ फूट मापाचा छुपा रूम (cavity) मिळून आला व तेथे एकूण 17 बारबाला आढळून आल्या. सबब सदर ठिकाणी मिळून आलेले एकूण 19 कस्टमर, 4 स्टूवर्ड वेटर, एक कॅशियर व एक मॅनेजर यांना ताब्यात घेण्यात आले. मिळून आलेल्या एकूण 21 बार बालांना नोटीस देऊन जाऊ देण्यात आले. याबाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यात एक मॅनेजर एक कॅशियर चार टू वर्ड वेटर्स व एकूण 19 कस्टमर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग श्री राजीव जैन, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 12 श्रीमती स्मिता पाटील यांच्या आदेशाने व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त दहिसर विभाग श्री वसंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक संजय मराठे, सपोनी निमगिरे, सपोनि एदाळे, पोलीस उपनिरीक्षक कोते व पथक यांनी सदर कामगिरी पार पाडली आहे.