पेल्हार वसई ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी, अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींचा २४ तासात छडा !!

पेल्हार वसई ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी, अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींचा २४ तासात छडा !!

        समाजात अजूनही स्त्रीयांच्या सुरक्षिततेला गालबोट लागत आहे, अल्पवयीन मुलींवर बलात्कार अपहरण अशा कितीतरी घटना रोज कुठेतरी घडत असतात. काही घटनांचा सुगावा लागतो, तर काहींचा नाही तर काही घटना इज्जत बेअब्रूच्या पोटी अंधारात कुठेतरी लुप्त होत असतात. ही खूप खेदाची गोष्ट आहे. 

             अशा घटनांची तक्रार केली असता. पोलीस यंत्रणांही अशा गुन्ह्याचा छडा लावण्यात कसोशीने प्रयत्न करून  गुन्हेगारांस बेड्या ठोकत असते. ह्या बद्धल त्यांचं कौतुकच, अशीच एक घटना वसई पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दिनांक १४/९/२२ रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास वलईपाडा, नालासोपारा (पूर्व) येथून ३ अल्पवयीन मुलींना कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, आमिष दाखवून फिर्यादी व्यक्तीच्या कायदेशीर रखवलीतून पळून नेले. ह्या घटनेची तक्रार पेल्हार पोलीस ठाण्यात फिर्यादीने केली. दिलेल्या फिर्यादी वरून  पेल्हार पोलीस ठाण्यात  गु रजि न ७८६ भारतीय दंड विधान कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

             सदर  गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटना स्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारावर अपहरित मुलींपैकी एका मुलीस सुरत गुजरात राज्य येथून व दोन मुलीस वापी गुजरात राज्य येथून २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन सदर मुलींना सुखरूप त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई पो. उप निरक्षक म्हस्के करीत आहेत.

             सदरची यशस्वी कामगिरी श्री प्रशांत वाघूंडें पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, श्री रामचंद्र देशमुख सहायक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विलास चौगुले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पो ठाणे, श्री महेंद्र शेलार पोलीस निरीक्षक (गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो उप नि सनील पाटील, पो हवालदार योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, पोलीस नाईक प्रताप पाचूंदे, पो अंमलदार संदीप शेळके मोहसीन दिवाण, सचिन बळीद, रोशन पुरकर, किरण आव्हाड, बालाजी गायकवाड, तसेच पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पो उप आयुक्त कार्यालय विरार यांनी पार पाडली.

         अपहरण झालेल्या ३ अल्पवयीन मुलीस २४ तासात शोधून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. परंतु अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे कारण अद्यापही समजले नाही. तरी मा आयुक्तांनी ह्या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लावून अशा अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या नारधमांचा छडा लावून त्याना बेड्या ठोकाव्या अशी जनता आणि बातमीकार वृत्तपत्र आपल्याकडून अपेक्षा करीत आहोत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी