नशा ? तुम बेचते रहो हम पकडते रहेंगे !

नशा ? तुम बेचते रहो हम पकडते रहेंगे !

       अंमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई यांची उल्लेखनीय कामगिरी, आफ्रिकन वंशीय इसमासह आणखी दोन इसमास अटक !!

         आज काल अंमली पदार्थाचे सेवन हे अगदी समाजाला लागलेली कीड आहे.  अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची अवैध विक्री खरेदी करणारे ही वाढले आहेत. आणि मुंबई नार्कोटिक्स विभाग ही तितक्याच प्रयत्नाने गुन्ह्याचा छडा लावण्यास यशस्वी होत आहे. अशाच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आफ्रिकन वंशाच्या इसमास अटक करण्यात आली. भारतात रोज कितीतरी पर्यटक येत असतात, किती काळ भारतात  परकीय पर्यटकांनी राहावं ह्या बाबत संविधानात काहीच नियंम नाहीत? ऑस्ट्रेलिया सारख्या देशात तर तीन महिन्यांच्या जास्ती देशात राहू देत नाहीत. परंतू भारत हे मोठी लोकसंख्या असलेला लोकशाहीचा देश आहे आणि भारतात हे सर्व नियम शिथिल आहेत आफ्रिका हा मागासलेला देश आहे आणि आफ्रिकन वंशाचे लोक भारतात वास्तव्य करून आहेत अंमली पदार्थाचे सेवन हे मुंबई व मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणावर केले जाते आणि बरेच नायजेरियन लोक भारतात अंमली पदार्थ विक्रीचा अवैध व्यवसाय करतात. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे सर्वात जास्त आयकर भारताला मुंबई शहरातूनच जात असतो, मुंबई हे आर्थिक कर वसुली करून देणारे पहिल्या क्रमांकात आहे. 

           आणि पैसा असला की सगळी थेर सुचतात. त्यामुळे मुंबई हे अंमली पदार्थाच्या खरेदी विक्रीत अग्रेसर आहे. परंतु मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्ष हे अहोरात्र मेहनत करून अंमली पदार्थ विक्री खरेदी करणाऱ्या इसमांवर कारवाई करीत आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्या अशाच एका टोळीचा पर्दाफाश मुंबई नार्कोटिक्स विभागाने केला. 

          घटना अशी की दिनांक १२/९/०२२ रोजी आझाद मैदान युनिटचे पथक गस्त घालीत असताना एल. बी. एस. रोड घाटकोपर (प) मुंबई येथे एक संशयीत हालचाल करणारा इसम वय वर्ष ४२ हा आढळून आला. संशयावरून त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ ३० ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचा मेफेड्रोन (एम डी) हा अंमली पदार्थ त्याच्या जवळ आढळून आला. त्या इसमास अंमली पदार्थासोबत ताब्यात घेण्यात आले. 

             त्याच्या जवळ अधिक तपास करता, त्यास अंमली पदार्थ पुरवठा करणारा मुंब्रा ठाणे येथे राहणारा दुसरा आरोपी वय वर्ष ४२ या पुरवठादार इसमाला १०० ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचा एम डी ह्या अंमली पादार्था सह शीळफाटा रोड मुंब्रा जी ठाणे येथे ताब्यात घेण्यात आले व त्याच्या विरुद्ध कलम ८ (क) सह २२ (ब) २९ एन. डी. पी. एस. कायदा १९८५ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक आरोपी कडुन १४५ ग्रॅम वजनाचा अंदाजे किंमत २५ लाखा पेक्षा जास्त साठा जप्त करण्यात आला.

             अटक आरोपी हे अंमली पदार्थांची खरेदी विक्री करीत असून त्यांचीही मोठी टोळी असल्याची शक्यता असून त्याचा आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीत सहभाग असून यामध्ये आणखी काही आरोपीचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

           सदरची कारवाई राजेंद्र दहिफळे, यांच्या नेतृत्वाखाली पो. उपनिरक्षक आवळे, निलेश भालेराव मानसिंग काळे, पोलीस हवालदार चाळके, पोलीस नाईक चव्हाण, पो शिपाई चाळके, आलेकर, पो ना चालक राठोड, पो शिपाई निंबाळकर यांनी पार पाडली असून गुन्ह्याचा पुढील तपास हा पोउनि आवळे करीत आहेत.

          तसेच दिनांक १३/९/२२ रोजी घाटकोपर युनिटचे पथक २०:३० वाजताच्या  सुमारास कलिना गाव, सांताक्रूझ पू मुंबई येथे गस्त घालीत असताना एक आफ्रिकन वंशाचा इसम संशयीत रित्या उभा असलेला दिसून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद  वाटत असल्याने पोलीस पथकाने त्यास शिताफीने पकडले. त्याच्या कडुन ९० पेक्षा जास्त वजनाचा एम डी मेफेड्रोन १८ लाखा पेक्षा हस्तगत करून त्यास अटक करण्यात आली.

             एन.डी.पी. सी. कायद्या अंतर्गत गु. र.क्र १६७/२०२२ कलम ८ (क) सह २२ (क) अनव्ये गुन्हा व नोंद करण्यात आला. अटक आरोपी हा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा असून दिनांक ८/४/२२ रोजी गुन्हा नोंदवून त्याच्या कडुन १०५ ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. अटक आरोपी नामे ओडुबुरू सोमुटोचुक्वु उर्फ लकी मोसेस वय वर्ष ३५ राहणार ९० फिट रोड नालासोपारा पुर्व, पालघर. मूळ गाव अनिन्रि, ओकोअनान  स्ट्रीट, राज्य एनुगु, नायजेरीया. हा देखील अंमली पदार्थाचा पुरवठा करीत होता. असे तपासात निष्पन्न झाले आहे.

             सदरची यशस्वी कारवाई घाटकोपर युनिटचे प्र पो नि लता सुतार यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षेचे सहा. पो. निरक्षक. राघवेंद्र लोंढे, पो नाईक खराडे, पो शिपाई गोमासे, महिला पो नाईक कोरपे, पो हवालदार चालक वाघ, यांच्या पथकाने केले.

             अशा प्रकारे अंमली पदार्था विरोधी कक्षचे आझाद मैदान घाटकोपर युनिटने एकाच वेळी दोन ठिकाणी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून दोन इसमा सहित आफ्रिकन वंशीय नागरिकांसह तीन इसमास बेड्या ठोकल्या व त्यांच्या कडून २४० ग्रॅम वजनाचा एकूण अंदाजे किंमत ४८ लाखाचा एम डी मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला. 

             सदर ची यशस्वी कामगिरी मा पोलीस आयुक्त बृहन्मुंबई मा पोलीस सह आयुक्त गुन्हे श्री सुहास वारके, मा अपर पोलीस आयुक्त श्री विरेश प्रभू गुन्हे, मा.पोलीस उप आयुक्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई, श्री. दत्ता नलावडे व माननीय सह्ययक पोलीस आयुक्त श्री. सवळरा आगावणे, यांच्या मार्गदर्शनानुसार यशस्वी करण्यात आली..


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी