
मुंबईतून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात भर, नार्कोटिक्स विभागाची यशस्वी कामगिरी !!
मुंबईतून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात भर, नार्कोटिक्स विभागाची यशस्वी कामगिरी !!
हल्ली अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे चोकलेट गोळ्या, खाण्यासारखे झाले आहे. आणि ह्या अंमली पदार्थ सेवनात तरुणपीडी अक्षरशः बुडत चालली आहे ही अंमली पदार्थांचे सेवन ही तरुण पिढी व भारत देशाला लागलेली वाळवी आहे, जी समाज व तरुण पिढीच्या भविष्याला नकळत पणे पोखरत चालली आहे. ही खूप गंभीर बाब आहे. एखाद्या व्यक्तीला कुठलंही व्यसन लागल्यावर ते सोडणं मुश्किलच आणि मग ते पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जातो. मुंबई सारख्या शहरात तर अंमली पदार्थच सेवन करणारे आणि ह्या ड्रग्ज च्या अथांग सागरात डुंबणाऱ्यांची संख्या अगणित आहे. बॉलिवूड पासून मोठं मोठे नेते, उद्योजक यांची मुले तर सर्रास अंमली पदार्थ सेवनात आढळतात.आणि मुंबई ह्यात अग्रेसर आहे. अंमली पदार्थांची विक्री समूळ नष्ट करण्यासाठी मुंबई नार्कोटिक्स विभाग अगदी डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत आणि यशस्वी ही होत आहेत.
अशीच एक यशस्वी कामगिरी नार्कोटिक्स विभाग बांद्रा यांनी पार पाडली. २४ ऑगस्ट रोजी मुंबई पनवेल हायवे मानखुर्द मुंबई या ठिकाणी दोन आफ्रिकन वंशाचे संशयित इसम अंमली पदार्थ विरोधी पथकाला गस्त घालीत असताना आढळून आले संशय आल्याने दोन्ही इसमांची झडती घेण्यात आली असता आरोपी कडुन एक किलो पेक्षा अधिक अंदाजे किंमत २,८०,००,००० रु किमतीचा उच्च दर्जाचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ सापडला. सदर आरोपी हे अंमली पदार्थांची विक्री करणारे इतर आफ्रिकन लोकांच्या टोळीचे सदस्य असून सदर टोळीच्या माध्यमातून आरोपी हे मुंबई व मुंबई बाहेर अंमली पदार्थांचा व्यवसाय करीत होते, ह्या गुन्ह्यातील पहिला आरोपी मायकल नेवाबु च्युकवूमा वय वर्ष ३४, दुसरा आरोपी ओझोक्येसिरी ओन्येका ओकेक्युक्वा वय वर्ष ४६ यांच्यावर गुन्हा रजि क्र कलम १६४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी मधील मायकल नेवाबु च्युकवूमा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या वर तुलिंज पोलीस ठाणे वसई जि पालघर येथे भारतीय दंड विधान कलम ३०२, १४ अ ब परकीय नागरिक कायदा अनव्ये गंभीर गुन्हा दाखल आहे, दोन्हीं आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा पोलीस सह आयुक्त गुन्हे श्री सुहास वारके, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री विरेश प्रभू, मा पोलीस उप आयुक्त श्री दत्ता नलावडे, सहायक पो आयुक्त आगावणे, अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष बांद्रा युनिटचे प्रशासकीय पो नि संजय चव्हाण, सहा पोलीस निरिक्षक सुरेश भोये, श्रीकांत कारकर, पोलीस हवालदार देसाई, तळपे, महिला पोलीस हवालदार चौरे, महिला पोलीस आव्हाड, पोलीस नाईक महाडेश्वर, मांढरे, पोलीस शिपाई सौदाणे, केंद्रे, पवार, राणे यांनी पार पाडली.