चोरटे ही बनले सी.आय.डी.ऑफिसर !!

चोरटे ही बनले सी.आय.डी.ऑफिसर !!

         आजकाल माणसांना कोणावर विश्वास ठेवावा. हे समजण कठीण झालंय पावलो पावली फसवे, लुटारू मोक्याच्या अगदी गर्दीच्या ठिकाणीही लुटत आहेत. अशीच  पोलीस ऑफिसर असल्याची बतावणी करून लूटमार करणाऱ्या इसमास नवघर पोलिसांनी बडे शिताफीने पकडले.

      दिनांक २२ जून ०२२ रोजी फिर्यादी श्री. मोहन सुरू शेट्टी, वय वर्ष ५६ हे त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी भाईंदर रेल्वे स्टेशन इथे रेल्वेचे रिझर्वेशन करून परत घरी जात असताना एक अनोळखी इसम वय वर्षे अंदाजे ४० ते ४५ वर्ष, अंगाने मजबूत याने फिर्यादी मोहन यांना तो सी.आय.डी. ऑफिसर आहे. अशी बतावणी करून फिर्यादी यांच्या गळ्यातील चैन, हातातील अंगठी तसेच रोख रक्कम ८,९०० रुपये असा एकूण १,१८,९००/- किमतीचा मुद्देमाल फसवणूक करून घेऊन गेला होता. सदर बाबत नवघर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम ४२०,१७० प्रमाणे अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

           सदर गुन्ह्याचा तपास करताना नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी मुन्नावर उर्फ अन्वर अब्दुल हमीद शेख वय ४५ वर्ष राहणार सोनाजी घोसावल्याच्या मागे, इब्राहिम आईची चाळ, कासाईवाडा, कुरेशीनगर, कुर्ला (प) मुंबई यास नालासोपारा येथून ताब्यात घेऊन दि. २७ जून ०२२ रोजी अटक केली आहे. तसेच आरोपी कडुन फिर्यादी यांची फसवणूक करून घेतलेल्या मुद्धेमाला पैकी १,१०,०००/- किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपी हा फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध मुंबई, ठाणे, नवीमुंबई आयुक्तलयात, तसेच पश्चिम बंगाल इत्यादी ठिकाणी त्याच्यावर एकूण ४८ पेक्षा फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

           पत्रकारांना माहिती देताना नवघर पोलीस ठाण्याचे एसीपी श्री. शशिकांत भोसले म्हणाले की आम्ही तुमच्या द्वारे जनतेला हे सांगू इच्छितो की अशा फसव्या भूलथापांना बळी पडु नका. करोना महामारीच्या काळात अशा फसवणुकीच्या घटना खुप घडल्या, करोनाच्या काळात काही संस्था मोफत धान्यवाटप करीत होत्या त्यावेळेस बरीच लोक धान्य घेण्यासाठी येत होते मग त्यावेळेस काही भुरटे चोर महिला व काही पुरुषांना हे सांगून लुटत होते की तुमच्या गळ्यात, हातात सोन्याचे दागिने आहेत, मग तुम्ही गरीब कसे रेशनिंग नाही मिळणार दागिने खिशात काढून ठेवा, मग अशा भूलथापांना बळी पडुन बऱ्याच जणांची फसवणूक झाली होती. 

           माहिती देताना श्रीयुत एसीपी भोसले म्हणाले की पोलीस हे तुमचे मित्र आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला पोलिसांना घाबरण्याचे कारण नाही, पोलीस कधीच  कुणाचे दागिने उतरविण्यास सांगत नाही एखादा अपघात झाला असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावरील दागिने ही पोलीस काढत नाहीत म्हणून अगर पोलीस असण्याची बतावणी करून जर तुम्हाला कुणी लुटण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा व्यक्तीची त्वरीत तक्रार करा, अथवा ११२ डायल करा अशी माहिती एसीपी श्री. शशिकांत भोसले यांनी दिली.

           सदरची कामगिरी श्री. अमित काळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१, डॉ शशिकांत भोसले, सहा पोलीस आयुक्त, नवघर विभाग, श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सह. पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उप निरीक्षक अभिजित लांडे, पोलीस हवालदार भूषण पाटील, पोलीस नाईक गणेश जावळे, पोलीस शिपाई नवनाथ घुगे, सुरज घुनावत ओमकार यादव विनोद जाधव यांनी पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी