आराम की जिंदगी जिने के लिए, करेंगे सायबर क्राईम !!

आराम की जिंदगी जिने के लिए, करेंगे सायबर क्राईम !!

 एटीएम कार्डची अदला बदल करून फसवणूक करणारा आरोपी गजाआड,

     हल्ली इझी मनी प्राप्त करण्यासठी चोऱ्या, घरफोडी आणि एटीएम मधून पैसे चोरणे हे अगदी हातचा मळ होऊन बसले आहे. कमी शिक्षण, मोल मजुरी करायचा कंटाळा, लाज, ऐश आरामाची जिंदगी जगण्याची प्रबळ इच्छा आणि मग त्यासाठी केलेले गुन्हे आणि असले गुन्हे करणारी यंग जनरेशन आजची तरुण पिढी आणि हल्ली इतकं तंत्रज्ञान प्रगत झालं आहे की अगदी पाचवी शिकलेला व्यक्ती ही अट्टल सायबर गुन्हे करीत आहे.

     अशीच एक घटना नवघर पोलीस ठाणे येथे उघडकीस आली. दिनांक ६ जून ०२२ रोजी तक्रारदार हे त्यांच्या राहत्या घरून बंदरवाडी नाका, भाईंदर रेल्वे स्टेशन जवळ ओसवाल शॉपिंग सेंटर जवळ नवघर रोड इथे असलेल्या एसबीआय बॅंकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. सदर एटीएम मधुन तक्रारदार हे पैसे काढत असताना एक अनोळखी इसम त्यांच्या मागे सदर ठिकाणी आला व तक्रारदार हे वयोवृद्ध असल्याने मी तुम्हाला पैसे काढून देउ का असे आरोपीने विचारलेव पैसे काढण्याचा बहाणा करून त्यांचा पिंनकोड विचारुन घेतला.

           त्यांच्या एसबीआय बॅंकेचे एटीएम कार्ड हातचलखीने बदलुन स्वतः जवळ ठेवले व स्वतः जवळचे नकली एटीएम कार्ड वापरले व पैसे काढण्याचे नाटक केले कार्ड डूब्लिकेट असल्यामुळे एटीएम मशीन मधून पैसे निघाले नाहीत. एटीएम मशीन मध्ये बिघाड आहे, अस सांगून खोट कार्ड तक्रारदार यांच्या हाती सोपवले. नंतर आरोपी तक्रारदाराचे एटीएम कार्ड घेऊन निघून गेला. नंतर नमूद तक्रारदार यांच्या एटीएम कार्ड द्वारे आरोपीने एकूण २ लाख ६ हजार १८५ रुपये वेगवेगळ्या एटीएम मधून काढले आणि सदर कार्डचा वापर करून वस्तू खरेदी केल्या. तक्रारदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नवघर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली.


           पोलीसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व घटनास्थळी तांत्रिक शोधाच्या साह्याने आरोपीस अटक केली, पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीजवळ विचारपूस केली असता, गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या रकमेपैकी १,५५,४६० रुपयांची खरेदी केलेली मालमत्ता एलईडी टीव्ही, सिलिंग फँन, कपडे, बूट, पाठीवरील सँग व आरोपी वापरत असलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी कडुन वेगवेगळ्या बॅंकेचे एकूण ३७ एटीएम कार्ड्स हस्तगत करण्यात आले असुन, यापूर्वी आरोपितांने केलेल्या फसवणुकीचे नवघर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ४२० चे गुन्हे दाखल आहेत व सदर गुन्ह्यात आरोपीच्या विरोधात भा दं वि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           सदरची कामगिरी श्री विजयकांत सागर पोलीस उपायुक्त मुख्यालय, पोलीस उप आयुक्त परी मंडळ १, डॉ शशिकांत भोसले सहा.पोलीस आयुक्त नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई नवघर पो. ठाणे, श्री. सुशील कुमार शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे, पो उप नि अभिजित लांडे, स पो नि योगेश काळे, पोलीस हवालदार भूषण पाटील, पोलीस नाईक गणेश जावळे, पोलीस शिपाई नवनाथ घुगे, पोलीस शिपाई सूरज घुनावत, पोलीस शिपाई विनोद जाधव, ओमकार यादव यांनी केली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी