
तरुण पिढी चोरीच्या मार्गावर दोष कुणाचा ?
घरफोडी करणारऱ्या युवकास नालासोपारा पोलिसांनी ठोकल्या बेड्या एकूण दोन लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत !!
वाढती लोकसंख्या, त्यातून निर्माण झालेली बेरोजगारी, तसेच इझीमनी, मित्रांची संगत, कामधंदा उच्चभ्रू लोकांसारख चैनीत राहणं. मग हौशी मौजी पूर्ण न करता आल्या तर त्या पूर्ण करण्यासाठी मग लुटपाट करणं चोऱ्या करणं अशा वाईट मार्गावर आजकालची तरुण पिढी सर्रास उतरताना दिसत आहे. कोणत्याही गोष्टीची भीती तमा न बाळगता युवा पिढी ही अट्टल गुन्हेगार बनत चालली आहे. मग ह्या सर्व परिस्थितीत दोष कुणाचा ? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि आता तर अट्टल सराईत चोरांना बरोबर भुरटे चोर ही तितकेच अट्टल चोर बनत चालले आहेत. अशीच एक चोरीची घटना नालासोपारा पोलीस ठाणेच्या हद्दीत घडली.
दिनांक ५ जून२२ रोजी फिर्यादी सौ.केशरी प्रदीप गुप्ता वय वर्ष ३५ यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली की , फिर्यादी या दिनांक २ जून रोजी भायखळा येथे त्यांच्या नातेवाईकांच्या घरी कामा निमित्त घर टाळेबंद करून राहण्यास गेल्या होत्या. त्यानंतर केशरी गुप्ता ह्या दि.४ जून रोजी उशिरा आपल्या घरी परत आल्या तेव्हा त्याना घराच्या दरवाज्याची कडी तुटलेली दिसली. घराची पाहणी केली असता कपाटातील समान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले तसेच कपाटात ठवलेले २२ ग्रॅम वजनाचे चांदिचे ब्रेसलेट व रोख तीन हजार रुपये चोरीस गेल्याचे निदर्शनास आले म्हणून त्वरित त्यानी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्या अनुषंगाने भारतीय दंड विधान कायदा कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
वरील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी कसून शोध लावून घटनास्थळी सापडलेले पुरावे व तांत्रिक माहिती वरून गुन्ह्याचा तपास सुरू केला. गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की गुन्हेगार हा नालासोपारा येथील आहे. त्या अनुषंगाने पोलीसानी सापळा रचून संशयित आरोपी बाबत माहिती प्राप्त करून, अरबाअली मोसीन मलिक वय २४ वर्ष खारकंडी मोह्हला, सोपरंगाव, नालासोपारा वेस्ट याला ६ जून २२ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरच्या आरोपी कडुन कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, सदरचा आरोपी हा मुंबई निर्मल नगर येथून तडीपार आरोपी असुन अजून दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी २,३८००५/- रुपये चा मुद्धेमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी प्रशांत वाघूंडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, चंद्रकांत जाधव सहा.पोलीस आयुक्त नालासोपारा, विलास सुपे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नालासोपारा पोलीस ठाणे, राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक, (गुन्हे) सहा. पोलीस निरीक्षक पंडित म्हस्के, अमोल तळेकर, पोलीस हवालदार आदिनाथ कदम, किशोर धनु, पोलीस नाईक सचीन कांबळे, पोलीस शिपाई सचिन मोहिते, पोलीस शिपाई राजेश नाटुलकर, पोलीस नाईक ढोणे यांनी यशस्वी केली.