पोलीस कोण चोर कोण ? विश्वास कुणावर ?

पोलीस कोण चोर कोण ? विश्वास कुणावर ?

      पोलीस असल्याची बतावणी करून जबरी पैसे उकळणाऱ्या आरोपितांना नवघर येथे अटक !!

      " पोलीस"हा शब्द जितका विश्वासाचा आहे तितकाच बदनाम पण आहे. सांगायची गरज लागत पोलीस म्हटलं म्हणजे जितकं लोक चांगलं बोलतात, तितकंच वाईटही बोलतात. काही ठराविक हप्तेखोर पोलीस कर्मचारी, त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटच नाव खराब झालं आहे. त्यांच्या बदनामीत प्रामाणिक कर्मचारी ही बदनाम होतात हे सत्य स्वतः पोलीस खात ही नाकारू शकत नाही. परंतु त्याच्या व्यतिरिक्त बार, हॉटेल, लेडीज बार, लॉज, बिल्डर, छोटे मोठे दारूचे धंदेवाले, दुकानदार अजून, काही वेश्या, रस्त्यावर बसणारे धंदेवाले, रिक्षावाले, इव्हन लायसन्स नसणारे बाईक, कारवाले अश्या आणखी कितीतरी लोकांकडुन पोलीस खात्यातील काहिजण हप्ते वसुल करीत असतात. असे लोक चर्चा करीत असतात. असे कानावर गुप्त बातमीदारा मार्फत ऐकू येत असते.

        मग अशा काही लोकांमुळे पोलीस खात खूप बदनाम ही आहे. जसा धंदा आहे तशी हप्ते वसुली काहीजण करतात आणि हे मी लोकांच्या तोंडून धंदेवाल्यांच्या तोंडून स्वतः ऐकलं आहे. वसईत तर गावठी दारू बनवण्याचे गुत्ते, खनिवडा रेतीवाले यांचे तर पोलिसांना जास्त हप्ते बांधलेले असतात अशी चर्चा असते. वसईत निर्मळ, कळंब कामण, नायगाव माल्जीपाडा येथे भरपूर गावठी हातभट्टीची दारु बनते अशा बेकायदेशीर दारूच्या हातभट्टी वाल्यानं कडुन सर्रास हप्ते वसुली होत असते. असे लोक बोलतात.

        मग अशा काही हप्ते खोर पोलिसांच्या वागणुकीचा फायदा भुरटे चोर घेत असतात. अशीच पैसे वसुलीची एक घटना नवघर येथे घडली.  

        दिनांक ३/५/ २०२२ रोजी फिर्यादी श्री विनोद मौर्य वय वर्ष २७ वर्ष यांचे किराणा मालाचे दुकान आहे आणि तीन तारखेला मिळालेल्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी ते स्कुटी ने गेले असता, इंद्रलोक नाका पानपट्टीवर मालाची डीलेव्हरी करीत असताना तेथे दोन अनोळखी इसम आले व ते पोलीस असल्याचे फिर्यादी यांना सांगून "तुम्ही घुटका विक्री करता"असे बोलून फिर्यादी यांना एका रिक्षात बसवून गोल्डन नेक्स्ट सर्कल येथे नेलें व सदर ठिकाणी फिर्यादी यांच्याकडे डिलिव्हरी केलेल्या मालाची रोख रक्कम १८०००/-रु जुलमाने घेऊन निघून गेले. सदर घटनेबाबत नवघर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

        सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे व गुन्ह्याचे गांभीर्य  लक्षात घेऊन, अधिकारी व अंमलदार यांनी तपास सुरू केला असता गुन्हेगाराने मोटार सायकलीचा वापर केल्याचे समजले. सदरचा गुन्हा करणारा पहिला आरोपी सिद्धार्थ रामदास जोहरे वय वर्ष ३९ हा असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु पोलिसांची चाहूल लागताच तो घरातून पळून गेला होता. त्यानंतर तांत्रिक तपास करीत असताना आरोपी सिद्धार्थ जोहरे हा बदलापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेत असताना त्याचा साथीदार अब्दुल अहमद खान वय ५९ वर्ष हा मिळून आला. त्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून गुन्ह्याची ८०००/-रु रक्कम हस्तगत करण्यात आली.

        सदरची कामगिरी श्री.अमित काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ -१, डॉ शशिकांत भोसले सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे, पो नि प्रकाश मासळ गुन्हे, सहा.पो.निरीक्षक योगेश काळे, पोलीस उप निरीक्षक अभिजित लांडे, पोलीस हवालदार भूषण पाटील, पोलीस नाईक, गणेश जावळे, पो. शिपाई संदीप जाधव, सुरज घुनावत, ओमकार यादव, विनोद जाधव यांनी केली.

        वरील घटनेचा आढावा घेता त्या चोरांनी पोलीस असल्याचा दावा करूनच का पैसे उकळले? इतरही सरकारी खाती आहेत, ह्याचे उत्तर हे मिळते पोलीस खात्यात काही खूप प्रामाणिक कर्मचारी आहेत पण काही ठराविक कर्मचारी हे बेकायदेशीर धंदा करणाऱ्यां कडुन लाच घेतात. ह्या सर्व घटनेला समाजही तितकाच कारणीभूत आहे असे मला वाटते. बेकायदेशीर धंदे करून त्या जोगे समोरचा लाच मागण्यास प्रवृत्त होईल अशी काम का करावीत ? आणि कायदेशीर धंदा करणाऱ्यांकडुन मागणी होत असेल तर का लाच लुचपत प्रतिबंध विभागात तक्रार करीत नाहीत ? पूर्वी पोलीस खात्याला अतिशय कमी पगार होता, काहीही सुविधा नसलेल्या कॉटर्स राहण्यासाठी देत असत. मग अशा वेळी कुटुंबाची जबाबदारी सांभाळण ही महत्वाच होत. त्यामुळे काहीतरी वरचा इन्कम म्हणून पैसे घेतले जायचे. रोज इतके गुन्हे घडत असतात, त्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ ही देऊ शकत नाहीत, भारत सरकार आपल्या सैनिकांना जितक्या सुविधा देते त्यापेक्षा खूप कमी सुविधा पोलीस खात्याला मिळतात. लाच घेणारा जितका दोषी इतकाच लाच देणारेही दोषी आहेत. कारण समाज ही तितकाच गुन्हेगार आहे, कारण बेकायदेशीर उद्योग ही तोच करतो. भारतात भ्रष्टाचाराचे जाळे खूप पसरले आहे. आणि या भ्रष्टाचाराच्या चिखलातून भारत देशाला मुक्त करण्यासाठी आपण स्वतःहून लढा उभारला पाहिजे तेव्हाच भारतात उत्तम कायदा सुव्यवस्था नांदेल.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी