
कमिशनचे पैसे मागितले तर केला खुनाचा प्रयत्न !!
पैसा जितका चांगला तितकाच तो वाईट पैश्याने भली भली नाती तुटतात व्यवहार खराब होतात, म्हणून पैशाचा व्यवहार करणं चुकीचं होऊन बसत. एखाद्या कामाचा मोबदला मागणं काही गैर नाही. परंतु तेही मागितल्यावर समोरचा देणेंस नकार देतो व कधी कधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करतो
दिनांक १७ मे ०२२ रोजी साडे अकरा वाजताच्या दरम्यान फारुकिया मशीद जवळ अंधेरी पश्चिम मुंबई येथे फिर्यादी हे त्यांच्या कामाचे मोबदल्याचे कमिशन आरोपी कडे मागायला गेले होते. परंतु आरोपिला पैसे फिर्यादीला द्यायचे नव्हते. त्यामुळे त्याने विनाकारण भांडण उकरून काढलं आणि फिर्यादी वर आरोपीने धार धार चाकूने, पोटावर, छातीवर व हातावर वार करून फिर्यादी याला जीवे ठार मागण्याचा प्रयत्न केला.
म्हणून फिर्यादी श्री अकबर असगर अली खान वय वर्ष ४२, धंदा मॅकेनिक राहणार तेहसील अपार्टमेंट, बी विंग कंपाउंड, अमृत नगर मुंब्रा, जिल्हा ठाणे यांनी दिलेल्या तक्रारी वरून कलम २०७ भारतीय दंड विधान सह १३५, ३७ (१) गुन्हा दाखल करण्यात आला.