
उद्रेक !!
भावनांना की वेदनांना
सांग कुणास मांडू मी..
आक्रोश चालला मनाचा
शब्द कोठुन आणू मी..
थकली आहे पापणीही
चिंब होऊनी रोजनिशी. .
सांग जीवनाशी या,
अजून कितीदा झगडू मी.
हट्ट आहे लोचनांचा
शांत हवी झोपही
सांग या अटळ मृत्यूस
अजून किती थांबवु मी..
पांढऱ्याचे काळे अजून
कागद किती करू मी
रोज माझ्या जुन्या व्यथेस
कितीदा नव्याने लिहू मी..
मृत्यु ही हुलकावण्या
देत आहे हल्ली मजला
सांग जीवाला छळशील किती
अन किती सोसायचे मी
उरले आहेत तुझे
वायदे प्रेमाचे फक्त
जगण्यास अजूनही
सांग कितीदा आठवू मी....
प्रिती तिवारी