छेडू नकोस तारा.....

छेडू नकोस तारा.....

       वृत्त: आनंदकंद 

(गागाल गालगागा, गागाल गालगागा)


छेडू नकोस तारा, अंगण उदास आहे...

येऊ नकोस आता, घरही भकास आहे...


आभास पैंजणांचा, छळतो मनास माझ्या 

होतात भास मजला, माझा कयास आहे...


फसणार मी न आता, ते डाव ओळखीचे 

हुकलो जरा जरी मी, नरडीस फास आहे...


बेजार भावनांचा, बाजार रोज भरतो

भेसूर शांतता पण, स्थितप्रज्ञ श्वास आहे...


प्राशून दिव्य मदिरा, भवरोग सांडला मी

चढती नशा न आता, खाली गिलास आहे...


होईल तारकांची, माझ्या तमात वस्ती

ध्यानस्थ कृष्णविवरी, माझा निवास आहे...


विरल्या हवेत इच्छा, अन् संपली कहाणी 

मातीत गाडला मी, खोटा लिबास आहे...


   _ध्रुव (पुणे)


Batmikar
बातमीकार

Most Popular News of this Week