तुला पाहताना.....
सखे, तुला पाहताना आठवते मला ते क्षण आपण सोबत जगलेलो..
तू नटूनथटून साडीत यायचीस
मी वेड्यासारखा, पाहत रहायचो..
काय रे, काय एवढं बघतो असं तू म्हणताच..
मी नजर लपवत, पुन्हा पहायचो..
सौन्दर्य या शब्दाला लाजवेल तू
असं तुझं देखणं रुप नटलेलं...
कौतुक न केल्यावर रुसून
बसणारी माझी रुसू बाई तू....
तुला पाहून मनमोहित होऊन !
कोणता शब्द वापरू आज कौतुकाला
हे कोडं माझंच मला न पटलेलं..
त्या आनंदी क्षणात आपण
मनसोक्त जगताना आठवते..
एक एक क्षण अविस्मरणीय करत
पुन्हा दुसऱ्या भेटीत यायचो हेही आठवते..
तसं बरचं काही आठवते!!
तुला पाहताना | तुला पाहताना....
शब्द मनातले..
(आदित्य पवार)