ती कशी अचानक भेट .....
ती कशी अचानक भेट आपुली घडली.....
नजरेत तुझ्या गं नजर ही माझी खिळली.
तुझे नयनबाण, घायाळ इथे मी झालो.
तव गालावरल्या खळीत पुरा पाघळलो
तुज नित्य भेटणे, वेड हे मजला लागे, आणखी काही मग मनी न मजला ठावे.
सांगेन तिला हे, धैर्य कधी ना झाले
मम अबोल प्रेम, हृदयातच राहुनी गेले.
मग काळ लोटला, भेट न आपुली झाली.
जशी अवचित आली, तशीच निघुनी गेली.
प्रारब्ध जणू की, पुन्हा भेट ही घडली.
अन् पुन्हा एकदा मनी प्रीत मोहरली.....
(अर्जुन शेवडे)