चोरलीस भाकर तू..... गझल
चोरलीस भाकर तू लाडक्या मुलासाठी
कोणती सजा देऊ या तुझ्या गुन्ह्यासाठी
होलपट कुणाचीही संपली कधी नाही
वेळ ठेव राखूनी वेगळी स्वतःसाठी
सोडली जगाने जी वंदता भुलाव्याला
केवढा गुन्हा केला गुप्तशा धनासाठी
थेंब ना कुठे रानी वाळला चिमणचारा
दूर पांगले पक्षी थांबलो कुणासाठी
खेळण्यात हा रमतो गायनात तो रमतो
केवढे छळे यांना बाप हे गुणासाठी
पाच साल सरल्यावर उगवलाय धुमकेतू
राजरोस राबवतो यंत्रणा मतासाठी
भेटलीस तेव्हा तू सावलीस मागितले
सोडतेस आता का तख्त हे उन्हासाठी
बबन धुमाळ, मो नं 9284846393