पाहिले तुला !!

पाहिले तुला !!

 धुंद चांदणे मनातले मी पाहिले तुला  पांघरताना

 प्रेमाची मी पाहिली नजर तुझी चोरटी  मोहरताना....थृ


आठवणींच्या मोरपिसानं पाहिली तुला शहारलेली

खरंच का मग सांग ना पुन्हा दिसशील आज लाजलेली

लक्ष लक्ष त्या  नक्षत्र खुणा अंगांगावर ग उमटताना 

प्रेमाची मी पाहिली मी नजर तुझी चोरटी मोहरताना.........१

उंबरठ्यावर तुझ्या यौवना सांजवेडी किती बागडली

 गंधबावरी तुला सखे त्या                             प्राजक्ताने का खुणावली

दवबिंदुंची मुक्त पालवी अधीरतेने लपेटताना

प्रेमाची मी पाहिली नजर तुझी चोरटी मोहरताना.......२

स्वप्नेअलगद मृदू तुझी ती तुषार तरंग कशी ल्यायली

पापणीत का मोद भरे ही क्षणभर होती जरी थांबली

काळीजकाठ दिसतो शांत डौलात तूच ग विहरताना

प्रेमाची मी पाहिली  नजर तुझी चोरटी मोहरताना.......३


डॉ निलांबरी गानू

राजगुरुनगर पुणे ????????????


Batmikar
बातमीकार