सण पाडव्याचा आला..!
गुढी उभारू मांगल्याची
नवं वर्षाची ही सुरुवात,
संस्कृती परंपरागत रूढी
साजरी होई घराघरात...!!१!!
चैत्र महिन्यात आला सण
हर्षाचे लेणे घेऊन माणसात
दुःख दरिद्री पळून जाईल
गुढी सुख देईल जीवनात...!!२!!
गुढी उभारूया मानवतेची
प्रत्येक माणसांच्या हृदयात
माणूसपण रूजवूया निस्वार्थ
मानवाच्या खोलवर गाभाऱ्यात...!!३!!
मंगलमय होईल जीवनाचे
सकारात्मक विचारांतून
अज्ञानाचा तिमिर घालवू
आपल्या सत्कर्माच्या गुढीतून...!!४!!
ठेवा अनमोल हा उत्सवाचा
जपूया प्रत्येकाच्या मनामनात
मांगल्य जीवनाचे गुपितं हे
गुढीपाडवा सण हा घरादारात...!!५!!
*कवीनंदेय...*✍????
*वांद्रे, मुंबई.*