वर्ष कसं निघुन गेलं !!
तू एक वहीचे पान हो
मी नाज़ुकसे पेन होईन
तू अशीच साथ दे
मी झरझर लिहित जाईन
असेच आंतरीचे भाव
तुला सांगत जाईन
तू अशीच रहा ना
मीही अशीच बहरत जाईन
वर्ष कसं निघुन गेलं
तुला तरी समझले का
जपुन ठेवलेलं मोरपिस
तुला तरी आठवतं का?
???? कवयित्री सोनाली टोपले