लोकलमध्ये सुकुमाराचा खून, आरोपीला ठोकल्या बेड्या !!

लोकलमध्ये सुकुमाराचा खून, आरोपीला ठोकल्या बेड्या !!

    छोट्याशा वादावरून केला लोकलमध्ये सुकुमाराचा खून!!!! केली आईची गोद सुनी,, आरोपी खुनी रोशन सुवर्णा याला ठोकल्या बेड्या!!!!


      मुंबई : पश्चिम रेल्वेने चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनमधील चाकू हल्ल्याच्या घटनेला दिलेल्या घटनेचा सविस्तर तपशील दिला आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, रेल्वे, आरपीएफ, जीआरपी आणि वैद्यकीय पथकांनी समन्वय साधून जखमी प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी रात्री, ट्रेन क्रमांक ९९६६३ (चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल) मध्ये प्रवास करणारा २२ वर्षीय तरुण प्रवासी मयंक लोहार आणि दुसऱ्या एका प्रवाशामध्ये मुसळधार पावसात लोकल रेल्वेच्या डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला. हा वाद ट्रेन अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान घडला. याचदरम्यान, एक मोठी अपडेट या घटनेत समोर आली आहे. आरोपीची ओळख पटवण्यात आल्याचा पोलिसांनी मोठा दावा केला आहे.


           ट्रेन थांबण्यापूर्वीच आरोपी ट्रेनमधून फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, झालेल्या वादावादीदरम्यान आरोपीने मयंक लोहारच्या पोटात चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं. रात्री ११.०४ वाजता ट्रेन बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर पोहोचली. ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या निवेदनानुसार रात्री ११.७ वाजता ट्रेन स्टेशनवर पोहोचल्यानंतर तीन मिनिटांच्या आत जीआरपी आणि आरपीएफचे जवान डब्यात पोहोचले आणि त्यांनी जखमी प्रवाशाला मदत केली. रात्री ११.१० वाजता स्ट्रेचर, पोर्टर आणि वैद्यकीय मदत पथक घटनास्थळी दाखल झाले.


       जखमी मयंकला डब्यातून काळजीपूर्वक बाहेर काढून प्रथमोपचारासाठी नेण्यात आलं. रात्री ११.२२ वाजता, त्याला बोरिवली स्टेशनवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात (EMR) नेण्यात आलं, जिथे एका डॉक्टरने त्याची तात्काळ तपासणी केली. रात्री ११.२२ ते ११.४२  च्या दरम्यान, रेल्वे, आरपीएफ आणि जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी जखमी मयंकला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रात्री ११.४२ वाजता मयंकला रुग्णवाहिकेनं कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. या काळात जीआरपी आणि आरपीएफचे जवानही त्याच्यासोबत होते. रुग्णवाहिका रात्री ११.५२ वाजता शताब्दी रुग्णालयात पोहोचली. दरम्यान, रात्री सुमारे १ वाजता मुंबई सेंट्रलचे एडीआरएम आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त बोरिवली स्टेशनवर पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.


       तपास यंत्रणा सीसीटीव्ही फुटेज तपास....


          पश्चिम रेल्वेनं सांगितलं की, माहिती मिळताच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल, जीआरपी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून जखमीला तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे जतन करून तपास यंत्रणांना सुपूर्द करण्यात आले आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, उपलब्ध नोंदींवरून हे स्पष्ट होतं की, ट्रेन बोरीवलीला पोहोचल्यानंतर मदत पुरवण्यात कोणताही अवाजवी विलंब झाला नाही आणि सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई केली. सध्या या प्रकरणाचा तपास शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) करत असून, तपासानंतर या घटनेशी संबंधित इतर तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे.

        नेमकं काय घडलं?

   रात्रीचे १० वाजून ५ मिनिटं.. चर्चगेटहून नालासोपारा फास्ट ट्रेन निघाली.. यानंतर वेळ रात्री साडे दहाच्या आसपासची असेल. इतर प्रवाशांसोबत २ जण अंधेरीत ट्रेनमध्ये चढले. दोघंही एकाच फर्स्ट क्लास डब्यात चढले. गाडी अंधेरीतून बोरिवलीच्या दिशेने जायला लागली. बाहेर मुसळधार पाऊस सुरु होता. एक व्यक्ती लोकलच्या दारात उभा होता. आत पाणी येत असल्याने इतर प्रवाशांनी त्याला दार बंद करण्याची विनंती केली. पण त्यानंतरही तो दार बंद करायला तयार नव्हता. यावरुन इतर प्रवासी आणि त्या व्यक्तीमध्ये बाचाबाची सुरु झाली. याच डब्यात २२ वर्षांचा मयंक लोहार सुद्धा होता. तो सुद्धा त्या व्यक्तीला दार बंद करण्यास सांगत होता. यावरुनच बाचाबाचीचं रुपांतर वादात झालं आणि त्यानंतर दार बंद करण्यावरुन सुरु झालेला वाद इतकं भयंकर रुप घेऊन याची कोणी कल्पनाही केली नसेल. कारण दार बंद न करणाऱ्या व्यक्तीला काही प्रवाशांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने बॅगमधून चाकू काढला आणि मयंक वर सपासप वार केले. इतर प्रवाशांना काही कळायच्या आतच मयंक लोकलच्या दारातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. पण समोरच्याचा जीव घेऊन सुद्धा आरोपीचा आत्मा शांत नव्हता झाला. तर तो इतर प्रवाशांना सुद्धा घाबरवत होता. सगळ्यांच्या छातीत धडकी भरली होती. त्यामुळे चालत्या लोकलमध्ये करणार काय मग प्रवाशी आरोपीपासून लांब पळत होते... आणि हत्या करणारा आरोपी मस्तवालपणे डब्यात फिरत होता.

 

चाकू हल्ल्यानंतर काय घडलं?


     रात्री १०.४५ वाजता - हत्येनंतर आरोपी डब्यात दहशत पसरवत होता रात्री ११.४  वाजता - ट्रेन बोरिवली स्थानकात पोहोचली रात्री ११.५ वाजता - आरोपी उडी मारुन प्लॅटफॉर्म क्रमांक ६वर उतरला रात्री ११.७  वाजता - आरपीएफ आणि जीआरपी कर्मचारी डब्यात पोहोचले रात्री ११.२० वाजता - वेद्यकीय पथक, स्ट्रेचर, पोर्टर डब्यात पोहोचले रात्री ११.१२ वाजता - जखमी प्रवाशाला वेद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आलं रात्री ११.२२ वाजता - डॉक्टरांनी तपासणीनंतर मयांकला मृत घोषित केलं.


    या घटनेनंतर आरोपी चालत्या गाडीत लगेच उतरून प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरुन पसार झाला. पण तपासानंतर तो नेमका कुठे कुठे गेला त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं. यात आरोपी हत्येनंतर स्टेशन परिसरात सुरुवातीला दिसला. त्यानंतर रस्त्याने कुठेतरी तो चालत जाताना दिसतो.. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी  रोशन सुवर्णा नावाच्या आरोपीला कुर्ला भागातून अटक केलीय.


     आता हा खून नेमका अनायसे झाला की काही योजना प्लान करून केला आणि खून करण्यात आला. हे अजून गुपित आहे ! असाच एक खून मागे लोकलमध्ये एका शिक्षकाचा झाला होता. आणि आता हा दुसरा खून मयंकचा झाला. जुनी दुश्मनी काढण्याचा हा एक नवीन मार्ग गुंडांनी शोधून काढला आहे का? समाजात आपल्या नावाची दहशत पसरविण्याचा हा मार्ग समाजकंटक दहशतवाद्यांना सोपा वाटतो का ? हा मोठा प्रश्नच आहे!!


     ह्या सर्व घटना घडण्यामागे जबाबदार कोण पोलीस यंत्रणा की हा समाज जो डोळ्यादेखत गुन्हा घडत असलेला पाहतोय, हे कोडं काही उलगडत नाही.!!!!!

      (प्रीती तिवारी)


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी