वरळीत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खच्चीकरण होते का ?

वरळीत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खच्चीकरण होते का ?

 वरळीत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खच्चीकरण होते का ?


   आज शिवसेना एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष साठावा वर्धापन दिन आपापल्या परीने साजरे करणार आहेत, विशेष बाब म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या वरळी विधानसभा क्षेत्रामध्ये तीन आमदार व सहा नगरसेवक आहे परंतु वरळी विभागात मात्र कोणताही प्रकारचा उत्साह दिसून येत नाही. 


       एकेकाळी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वरळी नाका विभागात मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे व पताका लावण्यात येत होते, मात्र यंदा नाममात्र एक सुद्धा झेंडा लावण्यात आलेला नाही ही एक शोकांतिका आहे उलट पक्षी शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या वतीने संपूर्ण वरळी नाक्यावर विस्तारीत मध्ये मोठे होल्डिंग व धनुष्यबाण चिन्ह असलेले झेंडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत व शिंदे गटाच्या बाजूने वातावरण निर्मिती करून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.


       ही बाब शिवसेना ठाकरे गटासाठी आत्मपरीक्षण करण्यासारखी आहे. ही चर्चा वरळीतील ठाकरे प्रेमी नागरिकांमध्ये सध्या होत आहे.


        त्याशिवाय वरळी विभागातून शिंदेंच्या ऑपरेशन टायगर वरती देखील टीका होत आहे, महाराष्ट्रातील ही फोडाफोडी आणि हे रसातळाला गेलेले राजकारण यावर देखील जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे